टाटा ग्रुप पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठा आहे का??
TATA VS PAKISTAN GDP
टाटा समूहाचे वर्चस्व
स्व. श्री जमशेटजी टाटा यांनी 150 वर्षांपूर्वी 1868 मध्ये टाटा ग्रुपची स्थापना केली. जगभरातील १५० हून अधिक देश आणि ६ खंडांमध्ये कार्यरत असलेला हा आघाडीचा समूह आहे. टाटा समूहाचे मुख्यालय मुंबईत आहेत. टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी (टीसीएस), टाटा स्टील, टाटा पॉवर, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, एअर इंडिया, इंडियन हॉटेल कंपनी या टाटा समूहाच्या अग्रगण्य कंपन्या आहेत.
टाटा समूहाने भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका आणि योगदान दिले आहे. टाटा समूहात विश्वास, सचोटी आणि नावीन्य पूर्ण आहे. ‘द इकोनॉमॉक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा समूहाची एकत्रित संपत्ती ३६५ अब्ज डॉलर म्हणजेच एकूण ३०.३ ट्रिलियन रुपयांवर पोहोचली आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था
पाकिस्तानची अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा कमी आहे. पाकिस्तानचे सध्याचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) मूल्य ३४० अब्ज डॉलर आहे. 2022 मध्ये पाकिस्तानचा जीडीपी अंदाजे 376 अब्ज डॉलर होता, परंतु 2023 मध्ये तो 340 अब्ज डॉलरपर्यंत घसरला. जीडीपी हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रतिनिधित्व करतो.
टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस)
टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) ही टाटा समूहातील सर्वात मोठी कंपनी आहे. ही आयटी सेवा पुरवते. ५० वर्षांच्या अनुभवासह टीसीएस जगभरातील १५१ देशांमध्ये सेवा पुरवते.
टीसीएसचे बाजार भांडवल १७९.९ अब्ज डॉलर आहे. जे पाकिस्तानच्या एकूण नॉमिनल जीडीपीच्या जवळपास निम्मे आहे. यामुळे टीसीएस जागतिक स्तरावर ६६ व्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे.
शेअर बाजार बद्दल अधिक माहितीसाठी,
https://sharebazaarandme.com/ओळख-शेअर-बाजारची-1-आयपीओ-2-ए/
Good job keeping greatwork
thanx plz revisit for more update..